Ignatius Dias https://ignatiusdias.virtuereal.com Mithakmanjar ani Itar Kavita Sat, 03 Sep 2022 04:34:03 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 202004682 फेसबुकवरुन – स्वप्नील शेळके https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b3/ https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b3/#respond Thu, 11 Aug 2022 04:54:20 +0000 http://ignatiusdias.virtuereal.com/?p=394

राईचा पर्वत करणारी इग्नेशियस डायसची कविता : ‘कुल्फीवाला वितळला तो उष्ण दिवस’

‘कुल्फीवाला वितळला तो उष्ण दिवस’ ही इग्न्याशिअसची कविता तीन भागांमध्ये येते.

पहिला भाग वरवर पाहता (आकळण्याच्या दृष्टीने विचार करता) साधा आणि सरळ आहे. पण तरी या भागात काहीतरी मॅजिकल आहे. ते ‘काय’ संगितले आहे त्यामुळे नसून ते ‘जसे ’ सांगितले आहे त्या शैलीमुळे आलेले आहे. ती शैली म्हणजे “दुपारला बांधलेली आहे/ घट्ट घंटी” या दोन ओळींमध्ये मला मॅजिक देऊन गेलेली शैली. दुपारला ‘बांधलेली’ असे आल्याने हा अनुभव कवितिक झाला. कवितिक असे म्हणताना आतमध्ये होणारी थरथर , भावनांची कालवाकालव किंवा वेगवेगळ्या वाचक समुहांच्या आतील भावविश्वाला स्पर्शून जाण्याची ताकद या आणि अशा अनेक बाबी यात अंतर्भूत होतात. उदाहरणार्थ मला आठवला तो शासकीय वसाहतीत गेलेल्या माझ्या बालपणाच्या दिवसांमधला दुपारच्या कडकडीत चारच्या उन्हात नेमाने येणार ‘बालिया’ नावाचा मावा कुल्फीवाला. मी तिशीत घुसलोय. तो बालिया मी माझ्या वयाच्या दहाव्या वर्षांपर्यंत अनुभवला होता. त्याचं आणि माझ्या त्या काळातील अवस्थेच मिळून एक स्वतंत्र आणि सार्वभौम अस्तित्व होतं. त्या दोन बाबींच्या संगमात ज्या विचारांच्या लहरी निर्माण होत होत्या त्यातील तथ्ये जरी मला आज धूसर पद्धतीने जाणवत असली तरी त्यातील भाव मात्र या दोन ओळींनी जीवंत करून दिला. तो जीवंत झाल्याने माझा व्यावहारिक फायदा काय ? तर कदाचित काहीच नाही. केवळ स्मरणरंजन असेही कुणी म्हणू शकेल … किवा खूप काही यापलीकडे असेलही…. त्या कुल्फीवाल्याला अनुभवणारं बालपण आणि निरागसता जी काळाच्या ओघात संपत गेली , दबत गेली त्या हरवत गेलेल्या भावनांच विरेचण या ओळींमध्ये होतं. होऊ शकतं . मला ते तसं वाटलं.

आता याच भागातली उर्वरित कविता पाहिली तर ती इग्नेशियस एका विशिष्ट वर्गजाणीवेतून मांडतांना दिसतो. कुल्फी न परवडण आणि ती न मिळण यात बालपणाचा तो करपलेला अनुभव.(हा अनुभव व्यवस्थेच्या महाकाय चौकटीत पहिला तर क्षुल्लक वाटेल. कारण ज्या सभ्यतेत दुःखाच्या अहमहिका चालतात तिथे हे असं काही व्यवस्थेला दखलपात्र नसणं यात चुकीच काही नाही.) आणि त्याचं प्रतीक म्हणून घशात गोठून येणारा त्याच्या आतला बर्फ. जो अभावाचा निदर्शक आहे.

इथे वरती मला जाणवलेली भावावस्था सलग राहिली नाही. याची एक गंमत इथे आहे. माझ्या घरी येणारा बालिया 2 रुपयाची अशी त्यावेळी भारीतली वगैरे मावा कुल्फी आणायचा. आणि तो आला हे त्याच्या घंटेने कळायच. मला ती दुधाळ पांढरट मावा कुल्फी आवडत नसायची . बर्फाची रंगीबेरंगी गारिगार मी घरी मागायचो. हा गारिगारवाला त्याच्या अगोदर एक तास येऊन जायचं. ही नुसत्या बर्फाची साखरेची गारिगार मी खाऊ नये आणि आजारी पडू नये म्हणून ही कशी हलकी आणि दुसरी ती कशी चांगली दुधाची वगैरे मी अनेकदा ऐकल्याचे आठवते . मी रडायचो ते ही बळजबरी दिलेली मावा कुल्फी आवडायची नाही म्हणून. सांगायचा मुद्दा असा यातला अभावाचा मुद्दा मी वाचक म्हणून थेट अनुभवलेला नसला तरी माझ्या वेगळ्या प्रकारच्या (भलेही त्या दुःखद नसतील आज हास्यास्पदही वाटतील अशा ) आठवंनींना ट्रीगर करण्याची ताकद या वरच्या दोन ओळींमध्ये मला जाणवली. हे असं आठवून काय मिळतं ? म्हंटलं तर बरच म्हंटलं तर काहीच नाही.

दूसरा भाग येतो तो कवितेतल्या त्याच्या जुन्या अभावाच्या ‘आठवणीचा’ भाग म्हणून. गाभा अभावाचाच राहतो. इथे फक्त समोर असलेली ‘उपलब्धता’ त्या अभावाला जागं करते इतकच . पण ती नुसती जग बदलले आहे, आमच्या वेळी असं नव्हतं… किंवा हे नॅचरल्सचं आईसक्रीम कसं खोट्टखोट्ट नैसर्गिक आहे वगैरे म्हणून गळे काढणारी नाहीय. म्हणजे ती परंपरा किंवा जुने दिवस विरुद्ध नवे दिवस असा काही संघर्ष उभा करत नाही. बालपणात राहून गेलेल्या अनेक इच्छा मध्यमवर्गीय जाणिवांमुळे स्वतःच्या अपत्यांच्या सुखात शोधण्याची कुप्रथा मराठी समाजात रुजलेली मला जाणवलेली आहे. त्यात आता यांना तरी मिळतय मग झालं असा भाव या वडील – आयांच्या मध्ये मला जाणवलेला आहे. विशेषतः पहिल्या पिढीच्या शिक्षणांतर कृषि ते नोकरी असा प्रवास झालेल्यांमध्ये तो सरसकट पाहता येतो . त्यांच्या आताच्या अवस्थेत ‘भूक मरणे’ हा भाव बघायला तुम्हाला मिळू शकतो. मग ते ही भूक मारतात आणि ती तशी मारणे हे कसे थोर आहे हे स्वतःला सांगतात..शिवाय आणखी उच्चउच्च वर्गीय लोक कसे आपल्यासारखे नसतात म्हणून स्वता:ला गोंजारूनही घेतात. पण हा सर्व भौतिक दमनातून आलेला खोटा सांस्कृतिक अहंगंडच असतो.

दुसर्‍या भागातल्या शेवटच्या ओळी- वर जे काही म्हंटलं आहे , त्यातलं काही समोर न आणता मोठ्या झालेल्या माणसातली बालपणाची तहान तेवढी दाखवतात आणि थांबतात. मला हे स्पर्शून गेलं. वरवर पाहता ही आधुनिकतेने आणलेल्या सुबत्तेवरची आणि जीवन शैलीवरची टीका आहे म्हणून गल्लत इथे होऊ शकते. पण या कवितेत मला तो भाव जाणवला नाही , हे मला विशेष वाटतं.

आणि शेवटचा तिसरा भाग !! खास मध्यमवर्गीय अपरिहार्यता आणि अटळतेच प्रतीक म्हणून हे घट्ट चिकटलेल विरून टाकलं जाणं . आणि हे विरून जात असतांना आपोआप आध्यात्मिक होत जाणं. अनुभवाची भूत -वर्तमान-भविष्य या कालमापनातील वर्तुळाकार गणती सुरू होत जातांना जाणवते. बाहेरच ऊन की थंडी की घशातली तहान या अनुभवांच गरगर फिरणं इतक्या एकजिनसी पद्धतीने वाचकाला जाणवतं की हा वितळत जाणारा सुरुवातीचा अभावाचा अनुभव प्रत्येकाच्या आतल्या न मिळत्या अनुभवांना वितळवून टाकू शकतो. अर्थात हे ज्याच्या त्याच्या संवेदनेवर अवलंबून.मला हे भावलं . तसंही कविता वाचण्याचे दिवस इथे काही राहिले नाहीत. कवितेची टर उडवण आज खरं जास्त प्रतिष्ठेचं. शिवाय तिचे पुरस्कार , प्रतिक्रिया गाजवण हे जास्त महत्वाच आता.

मला कविता आवडली हे आहेच पण माझा मित्र इग्न्याशिअस अनेक दिवसांनंतर कविता लिहायला लागलाय हे बघून बरं वाटलं.

आता या पसार्‍याला कुणी उगी छोट्याश्या कवितेचा – राईचा पर्वत करणे असं म्हणूही शकेल. पण माझं म्हणणं जुनंच आहे . राईतून पर्वत उभा करणारी तिच तर कविता…बसल्या जागेवरून लांबवर पाहू शकणारी कविताच फक्त … नक्की वाचा.

______________________

अॅडहौक आध्यात्मिकतेची कविता

इग्नेशियस डायसची काही दिवसांपूर्वी वाचलेली ही कविता . अॅडहौक(तात्पुरती) शांततेची , अॅडहौक आध्यात्मिकतेची ही कविता आहे . मग माझ्या डोक्यातल मॅजिक उचंबळून वर येतं ही ओळ कवितेत पुन्हा पुन्हा येते . या ‘मग’ मध्ये काय आहे ? दृश्य पातळीवर सोशल मीडिया आणि सतत बोलत राहण्याच्या सार्वत्रिक विकाराची पार्श्वभूमी यातल्या काही ओळींमध्ये आहे . सतत व्यक्त होत राहणं , सतत Consume होत राहणं आणि त्याचवेळी आतल्या शांततेच्या शोधाचा क्षीण होत चाललेला आवाज ऐकण , तो आवाज ऐकू येत राहावा यासाठी धडपड करण ,तो आवाज हरवू नये यासाठी सतर्क असणं आणि साध्या भाषेत सांगायचं तर कळत असूनही वळत नसणं -यासाठीचा हा ‘मग’ आहे. प्रत्येकवेळी नवीन दृष्टांताची गरज असणं आणि तो मिळाल्यावर पुन्हा शांततेच्या मार्गावर चालणं ही अटळता, अर्धवट आध्यात्मिक शोध घेतलेल्या समाजाचे भागध्येय असतेच ; असे नसते तर मौन होणं त्याला किंवा तिला केव्हाच साधलं असतं .परंतु मौन होणं आणि आधीची जगरहाटी घेऊन फिरणं या दोहोंच्या मध्यात ही चिन्हं येऊन पडतायतं हेही गरजेचे आहेच . हा मधला संघर्ष तितक्या भेदक पद्धतीने ,चिन्हांवरच्या हुकूमतीने तसाच्या तसा मांडू शकणारे आणि त्याचबरोबर समस्येची व्यापक जाण असणारे, केवळ तर्क या एकमेव हत्यारावर अवलंबून नसणारे , आध्यात्मिकता जाणणारे जे समकालीन कवि आहेत त्यात महेश लोंढे Mahesh Dattatraya Londhe, इग्नेशियस डायस आणि सत्यपालसिंग राजपूत Satyapalsingh Rajput ही महत्वाची नावे आहेत . सर्जनशील कलावंताला श्रद्धा , बुद्धी आणि तर्क या कांटच्या विचारांची जोड असल्यास त्याचा शोध multi faceted होऊ शकतो असं या तिघांकडे पाहिल्यावर लक्षात येतं . या तिघांची कविता पुढे कशी येईल , ती काय वळण घेईल याची एक उत्सुकता मला कायम असते.

इग्नेशियसची ही कवितासुद्धा याच गोष्टींचा धांडोळा घेते .

‘मग हे सगळं मी नसतं केलं तरी चालल असतं’

‘मग माझ्या मेंदूतल कौतुक आटत जातं’

‘मग मी विचारांना घाम येईल इतकं संडासात बसायचं नाही हे ठरवतो’

‘मग आपण काही लिहुयाच नकोत वर शिक्कामोर्तब होतं’

या ओळींमध्ये तो ‘मग’ आहे . या ओळी प्रातिनिधिक आहेत . केवळ सोशल मीडिया , इलेक्ट्रोंनिक उपकरणं यांनी व्यापलेला भवताल आणि त्याचे पेच इतका मर्यादित अवकाश यात नाहीय . मुळात आत्मिक शांतता भंग होईल आणि नैसर्गिक सर्जन मृतवत होईल अशा अनेक गोष्टी समष्टीत असतात. भागध्येय असेल किंवा जाणीवपूर्वक विकारांच्या आहारी जाऊन ती आत्मिक शांतता तोडण्याची तरतूद सामान्य व्यक्ती करतच असते . भांडवली व्यवस्था , अनागोंदीच राज्य , चंगळवादी बाजार- या आणि इतर बाबी या प्रवृत्तीला आणखी गडद करण्याचं काम करत असतात . या अर्थाने ही कविता केवळ मर्यादित काळाची राहत नाही . संदर्भ बदलले तरी स्वसंवाद आटत जाण्याचा धोका , निवेदनाला करावा लागत असलेला प्रत्येक काळातला संघर्ष असतोच .त्याला भिडन्याचा मार्ग जरी या कवितेत नसला तरी मौनापूर्वीची फडफड व्यक्त करण याचं महत्व कमी होत नाही . आणि तसंही कलाकृतीने गणितासारखा उपाय द्यावा असेही नसतेच . नाहीतर ती कलाकृती राहणार नाही .

शेवटी जो बायकोचा संदर्भ येतो त्यात कविता बाहेरच्या Generic अनुभवातून आत येत पुरुषी संवेदना प्रकट होते.बायकोशी हरवलेला संवाद इतक्या खाजगी पातळीवर ती येते . अर्थात इथेही ती प्रतिकात्मकच आहे . हरवलेला संवाद ही सुद्धा या अस्वस्थतेचीच देणगी आहे . मग ती बायको असो वा मित्रमैत्रीण .

या कवितेतली भाषा , लय मला आवडली आहे . अर्थात ‘मग मी ‘ ची पुनरुक्ती मजा आणणारी असली तरी आधीच्या अनेक कवितांमध्ये ती आहे . यावर भाषेच्या अंगाने काही होऊ शकते का ते पाहायला हवं . बाकी स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी या ओळीला जे फिरवल आहे ते वाचतांना मजा आली . इगनेशियसचा एरवी न दिसणारा खोडकरपना काही ओळींमध्ये दिसतो . तो मला आवडला .

मुख्य प्रश्न आहे वाचकाला यातून काय मिळतं ? ज्याचीत्याची शांतता क्षणभरासाठी क्लिक करवून देण्याची क्षमता या कलाकृतीत आहे . ती मिळाली की धरून ठेवायची की स्क्रोल करायचं हे ज्याचं त्यानं ठरवायचं. Love Ignatius Dias

(Mahesh Leelapandit ने या कवितेच छान पोस्टर केलं आणि ते शेअर केलं त्याबद्दल आभार )

______________________

काही कवितांमध्ये म्याड्नेस असतो ,इग्नेशियस च्या या कवितेत ‘controlled madness ‘ आहे . सैरावैरा भावावस्थेला पकडून उलटसुलट करून पाहणं , तिचा रंग , तिचा पोत , तिचा पदर , तीच अंतरंग असं एक एक करत तो बघत राहतो . तथाकथित अंगावर वगैरे येणारी ती कविता नसते . ती ताबा घेते . Conquest of mind ! चांगल्या कवितेत रूपक आणि कविता सुट्या राहत नाहीत त्यातली ही कविता . mandness किवा वेडसरपणाला वेगळं परिमाण देणारी ही कविता आहे . मला आवडणारं अतिप्रिय अस Abstract असणं या कवितेत ठासून आहे . विशेष म्हणजे abstract ठेवूनही ज्या पद्धतीने तिचे पदर हळूहळू ज्या सहजतेने उलगडत जातात त्याच कारण एकच – निर्मितीच्या वेळचा तिचा सहजभाव . it paved its way through consciousness from that inner self . आणि तिथेच वेदना , अस्तित्व , कोंडमारा , अपराधगंड , भय , एकटेपणा यांचं कोलाज तयार होत .. त्यांचं प्रमाण जितकं आत आहे तितकच कवितेतही टिकून राहतं . प्रामाणिकपणा आणि कन्फेशन जेव्हा abstract रूपात अवतरते आणि तीही चिडचिड न करता तेव्हा ही अशी कविता होते . जी या भावावस्थेतील इतरांना मोकळ करून जाते . क्याथोर्सिस म्हणजे आणखी काय . मला भावलेली कविता

]]>
https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%ab%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%ac%e0%a5%81%e0%a4%95%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a5%81%e0%a4%a8-%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%a8%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b6%e0%a5%87%e0%a4%b3/feed/ 0 394
आपण पाहिले जातोय https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%af/ https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%af/#respond Thu, 11 Aug 2022 03:41:35 +0000 http://ignatiusdias.virtuereal.com/?p=373

आपण पाहिले जातोय

जळी स्थळी पाहिले जातोय

काष्ठी पाषाणी

मॉली मल्टीप्लेक्सी

स्कुली कॉलेजी

रेल्वेस्टेशनी बस्टँडी

पाहिले जातोय

आपण

 

तू आधीपासूनच

होतास यत्र तत्र

आताही आहेच

तुझा सुक्ष्मदर्शी डोळ्यांचा कॅमेरा

सर्वत्र

 

आपण पाहिले जाऊ ची

आदिम भीती आणि

तुझं दहशतवादी अस्तित्व

आमच्या मनात कायम

 

आमच्याच डोळ्यांनी तू पाहतोस

आमचं सिकुडलेलं अंग

कविता लिहिणं

बाथरुमातील हस्तकौशल्य

मेंदूत पॉपपणारी उंची स्वप्नं

उसळून आलेली सेक्सेच्छा

काहीच होवू शकत नाही नजरेआड

 

ऐन ऑरगॅजमच्या आधीच

गुंडाळून घेतलेलं अंग

सूक्ष्म सूक्ष्म

पाहिलं जाण्याच्या पलीकडे

तिथेही हजर

तुझी चाणाक्ष नजर

 

कान असायचे भिंतींना

आता डोळेही उगवून आलेत

 

ऐकली जाईल कारस्थानी कुजबूज

बघितली जाईल संशयास्पद हालचाल

सुटेल गोळी डोळ्यातून

घुसेल आरपार

देहापार

उघडे पाडेल मनसुबे

 

आपण कधीच न रचलेले

 

चुकूनही पापणी न मिचकावणारा

हा महाकाय डोळा

पाहतो आपल्या आत

खोलवर

 

आपल्यालाही माहीत नसलेल्या

आपल्या अपराधांचा

पाढा

त्याला तोंडपाठ

 

आपल्या इतक्या निकट

नव्हता डोळा याआधी कधीही

 

नव्हती इतकी दहशत

डोळ्यांची

की

विचारही

उमटण्याआधी मनात

हज्जारदा करतात विचार

 

मीच पाहतोय माझ्याकडे

 

माझ्याकडे पाहणार्‍या मीला

मी पाहतोय

 

मी पाहतो

माझ्याकडे पाहणार्‍या मीला

पाहणार्‍या मी कडे

 

मी आणि पाहणं

यांतलं आटत जातं

अंतर

 

पाहिलं जावू नये

हे शरीर

म्हणून कपडे घातले

तर कपड्यांना लगडलेले आतून

अंगांग न्याहाळणारे

सीसीटीव्ही सर्वज्ञ

कपड्यांच्या आतील आपला नग्नपणा

करीत अधोरेखित

आतल्याआत धांगडधिंगा

 

सर्वज्ञासमोर मी नंगा

 

कुठेच नाहीये डोळा

तरी पाहिलं जाण्याची क्रिया अविरत

 

डोळाच एकमेव पाहू शकतो

ह्या शक्यतेने कधीचेच मिटलेत डोळे

 

डोळे बंद

पाहणं सुरू

 

डोळेबंद

पाहणंसुरू

 

डोळेबंदपाहणंसुरू

डोळेपाहणं

 

पाहणं

 

साक्षात्कार

]]>
https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%86%e0%a4%aa%e0%a4%a3-%e0%a4%aa%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%b2%e0%a5%87-%e0%a4%9c%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%8b%e0%a4%af/feed/ 0 373
I blink therefore i am https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/i-blink-therefore-i-am/ https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/i-blink-therefore-i-am/#respond Thu, 11 Aug 2022 03:39:57 +0000 http://ignatiusdias.virtuereal.com/?p=370

मी पापण्यांची उघडझाप करतो

म्हणून मी आहे

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी हालचाल केलेली नाहिये

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी वर्तमानपत्र वाचलेलं नाहिये

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी बघितले नाहियेत प्राईम टाईम डिबेट्स

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी घेतलेला नाहिये श्वास

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी सोडलेला नाहिये उसासा

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

माझ्या धमन्या धावायच्या थांबल्यायत

 

गेल्या कित्येक दीवसांपासून

माझं ह्रद्य ध्यानस्थ झालंय

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

माझा मेडिटेशनेबल मेंदू गतीमंद झालाय

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी कोणाची विचारपूस केलेली नाहिये

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी माऊस क्लीक केलेला नाहिये

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी लोकलला टांगलेलो नाहिये

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी कविता लिहिलेली नाहिये

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी कविता वाचलेली नाहिये

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी कोणाची मारलेली नाहिये

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी कोणाकडून मारवून घेतलेली नाहिये

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी नाचलेलो नाहीये बेभान

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी हळहळलेलो नाहिये

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी आश्चर्यचकीत झालेलो नाहिये

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी समागमलेलो नाहिये

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी जाहिरात पाहीलेली नाहिये

 

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी काही खरेदी केलेलं नाहिये

 

गेल्या कित्येक दिवसांपासून

मी पापण्यांची उघडझाप करत आलेलो आहे.

 

मी पापण्यांची उघडझाप करतो

म्हणून मी आहे.

]]>
https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/i-blink-therefore-i-am/feed/ 0 370
स्मूथ उर्फ संवाद कम्युनिकेशन सहज https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%a5-%e0%a4%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ab-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a8/ https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%a5-%e0%a4%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ab-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a8/#respond Thu, 11 Aug 2022 03:38:33 +0000 http://ignatiusdias.virtuereal.com/?p=367

सॅड डिमाईज

आरायपी 

सच्चा भारतीय फॉरवर्ड केल्याशिवाय राहणार नाही 

तीन गुलाबी दुखी चेहरे 

६५ मुलं मेली 

ऍडमिन चा बड्डे

छे! फक्त छत्तीस मुलं 

हैप्पी बड्डे 

आरायपी 

एक फुरफुरणारा चेहरा जय हिंद 

विश्वास नांगरे पाटील 

आरायपी 

एक काळा दुखी चेहरा 

रक्तदान म्हणजे जीवनदान 

नाना पाटेकर 

दोन अंगठे 

आरायपी 

जगातल्या सगळ्या नवरा बायकांना पटणारा जोक 

अपर्णा रामतीर्थकर व्हिडीओ  

आरायपी 

हैप्पी बड्डे दोन बियर ग्लास एक क्रिमकेक एक पुष्पगुच्छ एक हाडूक 

१५ ऑगस्ट निमित्ते आमच्या कॅम्पमध्ये रक्तदान करा 

दोन गुलाबी दुखी चेहरे 

हाहाहाहाहाहाहाहाहाहा 

खूपच दुर्दैवी घटना 

आरायपी  

दहीहंडी 

च्या शुभेच्छा 

आज रात्रौ ११ वा. ५० मी. नी  पाचूबंदर येथे मासळी बाजार आहे. 

आरायपी 

आरायपी 

आरायपी

आरायपी

हैप्पी बड्डे 

मेनी हॅप्पी रिटर्न्स 

हॅपी बड्डे आणि आरायपी 

हाहाहाहाहाहाहाहाहाहा 

आरायपी 

मेसेज फॉरवर्ड करा चायनाला अद्दल घडवा 

ढोंगी राष्ट्रवाद 

आरायपी 

हॅप्पी बड्डे 

मासळी बाजारला मी जाणार आहे कोणी येणार आहे का?

हॅपी बड्डे

एक बोट वर असलेला पिवळा हात 

एक बोट वर असलेला गुलाबी हात 

एक अंगठा 

तीन अंगठे 

तीन पिवळे हसरे चेहरे 

एक गुलाबी हसरा चेहरा 

हॅपी बड्डे ऍडमिन 

आरायपी

पुन्हा सॅड डिमाईज

]]>
https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%a5-%e0%a4%89%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%ab-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%a6-%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%a8/feed/ 0 367
ट्रायल गेम https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%ae/ https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%ae/#respond Thu, 11 Aug 2022 03:36:51 +0000 http://ignatiusdias.virtuereal.com/?p=364

हवालदार माझ्या मागे

मी पुढे पुढे धावतोय

जीव मुठीत पकडून

माझा काय गुन्हा?

हवालदार कोणत्या पाशवी सत्तेच्या

हातातलं बाहूलंय?

अर्थात मी काही जोसेफ के.  नाहिए

फारतर तुम्ही मला

मिस्टर डी.  म्हणू शकता

जो धावतोय

कधीही पकडेल हवालदार

आणि तंगडं पकडून

बोकडासारखं उल्टं करेल म्हणून

 

अर्थात हा एक

अत्यंत जुनाट पाशवी गेमंय

ट्रायलच्याही आधीपासून चालत आलेला

ज्याला तुम्ही ट्रेनमधून प्रवास करतानाचा

टाईमपास समजताय

 

मी प्रत्यक्षात आहे का नाहीचा

प्रश्नच उरत नाही

एकदा तुमच्या मेंदूत मी

ठाण मांडून बसल्यावर

तुमच्या अंगठयाबरहुकूम मी धावतोय

असं तुम्हाला वाटण्याइतपत चपळाईने

मी नाचवतोचंयकी तुमच्या अंगठयाला

तुमच्याच स्क्रीनवर

माझ्या धावण्याबरहुकूम

 

अर्थात तुमच्या मेंदूतून

आनंदाच्या कारंज्या उडवण्याइतपत

मी सराईतय

समोरून भरधांव अंगावर येणार्‍या ट्रेन्स चुकवत

आणखी हवेत तरंगणारे गोल्ड कॉईन्स

गपागप गडप करण्यात

 

अर्थात हवालदाराचा कंट्रोल

तुमच्याकडे असता तर

तुम्ही मला सापडवलाच नसता

त्याच्या पाशवी हातात

इतके तर तुम्ही माझ्या अधीन

एव्हाना झालेलाच आहात मित्रवर्यहो

 

अर्थात हया एंन्डलेस रनिंग गेममध्ये

कोण धावतोय

कोण पकडला जातोय

कोण कोणाच्या मागे धावतोय

कोण कोणाच्या मागे का धावतोय

कोण सापडवला जातोय

कोण का सापडवला जातोय

असे अनेक प्रश्न

परंपरागत शिस्तीने तुमच्या पुढयात

उभे ठाकतील अडथळयासारखे

तो हया एन्डलेस गेमचा

एक अविभाज्य भाग जरी असला

तरी तुम्हाला त्याची

उत्तरे शोधण्याची परवानगी नाहिए

असा नियमचंय अर्थात

या एन्डलेस गेमचा

]]>
https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af%e0%a4%b2-%e0%a4%97%e0%a5%87%e0%a4%ae/feed/ 0 364
संवेदनशीलता थुई थुई नाचू लागल्याचं पाहून https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a5%e0%a5%81%e0%a4%88-%e0%a4%a5%e0%a5%81%e0%a4%88-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%82/ https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a5%e0%a5%81%e0%a4%88-%e0%a4%a5%e0%a5%81%e0%a4%88-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%82/#respond Thu, 11 Aug 2022 03:35:16 +0000 http://ignatiusdias.virtuereal.com/?p=361

लापता मुलाचा असतो फोटो

माहिती सापडल्यास

कळविण्यासाठी फोन नंबर

तुमचा फक्त एक सेकंद खर्च होईलच्या

व्यावहारिक तसल्लीसह

पोस्ट शेयर करण्याची विनंती

मी फोटो पाहत नाही

शेयर करत नाही

लापता मुलाचं नावही पाहत नाही

 

पुढे स्क्रोलतो दहा सेकंदांपर्यंत

एक मुलगी असते आजारी

आपला एक शेयर किंवा लाईक

तिच्या उपचारासाठी एक रुपया मिळवून देणार असतो

१.२ मिलियन लाईक्स

जवळपास तितकेच शेयर्स

मी गुणिले १ रुपया करतो

आपल्या एका लाईकने

पडणार नाही झाटभरही भर

तिच्या मदतीतच्या गणितासह

स्क्रोलतो आणखी डीप

तिथे चेंजडॉटओआरजी मधलं

एक पिटिशन असतं

त्यावर आपण साईन केल्यास

गवरमेंट एखादी योजना

चालू किंवा बंद करण्याची शक्यता असते

त्यात आपला फायदा किंवा तोटा

लक्षात घेण्याआधीच मी स्क्रोलतो आणखी खोलवर

तिथे एका बलात्कार पीडितेने

बलात्कार करणार्‍याचं लिंग

छाटून टाकल्याची बातमी शेयर करतो

व BRAVO लिहितालिहिता

लिंग जागेवर असल्याची खात्री चाचपतो

 

तिथून आणखी जरा खोलवर

सानिया मिर्झाचे अकरा सखोल फोटो पाहून

मी हादरून जाण्याची शक्यता

वर्तवलेली असते एबीपीमाझाने

आपल्या हादरून जाण्याच्या शक्यतेने

माझी हातभर फाटल्याचं निमित्त करून

मी अकराचेअकरा फोटो पाहून घेतो सुमडीत

नेमकी तेव्हा माझ्या मेंदूतली संवेदनशीलता

थुई-थुई नाचू लागल्याचं पाहतो

आणि मुळापासून हादरून जातो

]]>
https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%a6%e0%a4%a8%e0%a4%b6%e0%a5%80%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%be-%e0%a4%a5%e0%a5%81%e0%a4%88-%e0%a4%a5%e0%a5%81%e0%a4%88-%e0%a4%a8%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%82/feed/ 0 361
मी नर्सिसिस्ट थोडाचे https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87/ https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87/#respond Thu, 11 Aug 2022 03:33:25 +0000 http://ignatiusdias.virtuereal.com/?p=358

हा मीये

हे माझे प्रोफाईले

हा माझा फोटो

हा लहानपणीचा

हा शाळेत जायला लागल्यानंतरचा

हा कॉलेजला

हा पयल्या गलफ्रेंडसोबतचा शारूक

हा तिने दगा दिल्यानंतरचा देवदास

हा मित्रांबरोबर सन्मानमध्ये फुल्टुफटाक

हा लग्नाच्यावेळचा

हा बायकोसोबत हनिमुन स्पेशल

हा पहिला सेल्फी

हा दुसरा

हा शंभरावा

हा हसतानाचा

हा रडतानाचा

हा घाईघाईत सुलभ शौचालयासमोरचा

हगतानाचा नाहीये माझ्याकडे

मी नर्सिसिस्ट थोडाचे

]]>
https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%a8%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%a5%e0%a5%8b%e0%a4%a1%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%87/feed/ 0 358
मेंदूतलं मॅजिक https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%95/ https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%95/#respond Thu, 11 Aug 2022 03:32:12 +0000 http://ignatiusdias.virtuereal.com/?p=355

सांगितल्याप्रमाणे मग मी स्क्रोल डाऊन करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी फोटोवर क्लिक करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी फोटोखाली लाईक करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी कमेंटमध्ये एटीएट लिहितो.

सांगितल्याप्रमाणे मग मी फोटोतलं मॅजिक पाहतो.

मग हे सगळं मी नसतं केलं तरी चाल्ल अस्त असं वाट्ट.

मग माझ्या मेंदूतलं एक मॅजिक उचंबळून वर येतं.

 

सांगितल्याप्रमाणे मग मी अपडेट अॅपचं बटन दाबतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी स्पेस रिकामी करण्यासाठी डेटा डिलिट करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी डोकं रिकामी करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी नव्याने डोकं भरून टाकतो.

मग मी आतल्या आत नव्याने भरलेलं डोकं कौतुके पाहतो.

मग माझ्या डोक्यातलं कौतुक आटत जातं.

मग माझ्या मेंदूतलं एक मॅजिक उचंबळून वर येतं.

 

सांगितल्याप्रमाणे मग मी लॉगावूट होतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी दोन्ही हात पोटावर ठेवून पोटाला रेकी देतो.

सांगितल्याप्रमाणे मग मला संडासला साफ होते.

मग माझ्या डोक्यातला विचारांचा मार्ग मोकळा होतो.

मग मी बाहेर येवून घामाने ओथंबलेले विचार फॅनखाली सुकवत ठेवतो.

मग मी विचारांना घाम येईल इतकं संडासात बसायचं नाही असं ठरवतो.

मग माझ्या मेंदूतलं एक मॅजिक उचंबळून वर येतं.

 

सांगितल्याप्रमाणे मग मी मातृदिनाबद्दल काय लिहुयाचा विचार करतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी ह्याने हे लिहिल्याचं पाहतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी त्याने कविता लिहिल्याचं लाइकतो.

सांगितल्याप्रमाणे मग मी एका कवीने आईवर जब्राट लिहिल्याचं पाहून गद्गदतो.

मग मला जगातल्या सगळ्याच आया थोर असल्याचं एका स्वामीने तिन्ही जगातल्या भिकार्‍यांना सांगितल्याचं आठवतं.

मग आपण काही लिहुयाच नकोवर शिक्कामोर्तब होतं.

मग माझ्या मेंदूतलं मॅजिक उचंबळून वर येतं.

 

मग बायको बोलत असते तिला मी नेमक्या जागी हूं हूं ने प्रतिसादतो.

मग बायको माझ्या प्रतिसादासाठी बोलायचं थांबवते आणि मी हूं हूं करतो.

मग आपण बायकोचं बोलणं ऐकलं नसल्याचं तिला कळून चुकल्याचं मला कळून चुकतं.

मग मी खजील चेहर्‍याने बायकोला माझ्या मेंदूतल्या मॅजिकची गोष्ट सांगतो.

मग केसांतून हात फिरवत बायको ‘तू असा कसा रेSS’ ने लाड करते.

मग माझ्या मेंदूतलं एक मॅजिक उचंबळून वर येतं.

]]>
https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%ae%e0%a5%87%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a4%b2%e0%a4%82-%e0%a4%ae%e0%a5%85%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%95/feed/ 0 355
समझनेवालेकोइशाराकाफी भाषा https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%9d%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%87%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be/ https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%9d%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%87%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be/#respond Thu, 11 Aug 2022 03:27:03 +0000 http://ignatiusdias.virtuereal.com/?p=352

समझनेवालेकोइशाराकाफी भाषेत बोलतो मी

       मलासुद्धा आज
       दानधर्म करायची खुमखूमी आलीये
       दुपटीने देणाराय
       तुम्ही 1 भारतीय रूपया माझ्या बीटीसीअॅड्रेसवर पाठवा
       मी लगेच तुम्हाला 2 भारतीय रूपये परत करेन

       कोणीतरी माझा बीटीसीअॅड्रेस शेयर करा रे

       हॅशटॅगबीटीसीस्कॅम हॅशटॅगगेट्समस्कबेजोस

काय झाट समझलं नाय तुमाला

अॅलेक्सा डीयर
रशीदखानसाहेबांना काफी आळवायला लाव
त्यांच्या हातवाऱ्यावरून काय समजतं का बघूया

]]>
https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%9d%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b5%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%95%e0%a5%8b%e0%a4%87%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%ab%e0%a5%80-%e0%a4%ad%e0%a4%be/feed/ 0 352
वेळ कमी आहे https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87/ https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87/#respond Thu, 11 Aug 2022 03:25:46 +0000 http://ignatiusdias.virtuereal.com/?p=349

वेळ कमी आहे
अनादिकाळापासून
अनंतकाळापर्यंत

वेळ कमी आहे
लवकरात लवकर ताण दिला पाहिजे
लवकरात लवकर सुचले पाहिजे
लवकरात लवकर लिहीले पाहिजे
लवकरात लवकर बोलले पाहिजे
लवकरात लवकर

लवकरात लवकर शोधतो
लवकरात लवकर उत्तरतो
लवकरात लवकर लाईक करतो
लवकरात लवकर मत व्यक्त करतो
लवकरात लवकर तटस्थ होतो
लवकरात लवकर बाजू घेतो
लवकरात लवकर न्याय करतो
लवकरात लवकर पाहतो
लवकरात लवकर वाचतो
लवकरात लवकर वाचल्याचं ओरडून सांगतो
लवकरात लवकर

लवकराचा स्पीड अजून वाढवला पाहिजे
लवकराला लवकराने गुणलं पाहिजे
लवकरापेक्षाही लवकर पापणी मिचकावली पाहिजे

लवकरापेक्षाही कमी वेळ शिल्लक आहे आपल्यापाशी
आणि प्रतिमाघडण क्लिकेच्या आवाक्यात

]]>
https://ignatiusdias.virtuereal.com/2022/08/11/%e0%a4%b5%e0%a5%87%e0%a4%b3-%e0%a4%95%e0%a4%ae%e0%a5%80-%e0%a4%86%e0%a4%b9%e0%a5%87/feed/ 0 349