paperwall | Ignatius Dias https://ignatiusdias.virtuereal.com Mithakmanjar ani Itar Kavita Tue, 23 Aug 2022 16:13:02 +0000 en-US hourly 1 https://wordpress.org/?v=6.7.1 202004682 adhantarala Latakalelya Avatarnaat https://ignatiusdias.virtuereal.com/product/adhantarala-latakalelya-avatarnaat/ https://ignatiusdias.virtuereal.com/product/adhantarala-latakalelya-avatarnaat/#respond Fri, 21 Jan 2022 19:40:21 +0000 http://ignatiusdias.virtuereal.com/?post_type=product&p=77

adhantarala Latakalelya Avatarnaat

SKU: 9789382749240 Category: Tags: , , , ,

160.00

परंपरेने रचलेल्या मिथककथांचे समकालीन संदर्भात आकलन करून घेणारी दृष्टी या रचनांमधून प्रत्ययास येते. हरवलेल्या गावाचे मुक आक्रंदन आणि भौतिक प्रगतीच्या सर्वोच्च शिखरावर असताना मानवी संस्कृतीच्या वाट्याला येत असलेले शीघ्रचरित्रपतन यांबाबतचे संवेदनशील उद्गार व्यक्त करणारी ही एकूणच कविता परंपरेने हाती दिलेल्या मिथकथांचे पूनर्वाचन करताना समकाळाचा अंत:स्तर उसवून जगण्याच्या मर्मापर्यंत जाण्याचा प्रयत्न करते. - आशुतोष पाटील

‘अस्तित्वभान, विश्वभान, सर्जनशीलता, कल्पकता, संवेदनशीलता’ सारेच गमावून बसलेल्या आजच्या सायबरविश्वातल्या भूमीपासुन तुटलेल्यांच्या या गोष्टी आहेत. प्रत्यक्ष ‘मी’ आणि दाखवायचा ‘मी’ यांतले अंतर तर दांभिकतेच्याही पलीकडे गेल्याचे कवीला गोष्टींच्या मोडतोडीतून सांगायचे आहे. परंपरा बदलली नाही उलटी झाली! विरुपित गोष्टींचा सध्याचा काळ आहे. त्यामुळे पूर्वीच्या गोष्टी बदलून सांगण्याचा पवित्रा या कवितांनी घेतला आहे. – एकनाथ पगार

काही कवितांमध्ये म्याड्नेस असतो, इग्नेशियस च्या या कवितेत ‘controlled madness’ आहे. सैरावैरा भावावस्थेला पकडून उलटसुलट करून पाहणं, तिचा रंग, तिचा पोत, तिचा पदर, तीच अंतरंग असं एक एक करत तो बघत राहतो. तथाकथित अंगावर वगैरे येणारी ती कविता नसते. ती ताबा घेते. Conquest of mind! चांगल्या कवितेत रूपक आणि कविता सुट्या राहत नाहीत त्यातली ही कविता. mandness किवा वेडसरपणाला वेगळं परिमाण देणारी ही कविता आहे. – स्वप्नील शेळके

Additional information

Author

Ignatius Dias

Publisher

Poetry Primero

Language

Marathi

Publishing Year

2015

Edition

1

Pages

86

]]>
https://ignatiusdias.virtuereal.com/product/adhantarala-latakalelya-avatarnaat/feed/ 0 77