१. मी कवीता करतो म्हणजे मी कविता करतो.

२.  कविता लिहावीशी वाटते अशा अपरिहार्य क्षणात मी कविता लिहितो. कविता लिहिली नाही तरी चालेल असं जर वाटलं तर कदाचित मी कविता लिहीणारही नाही. पण माझ्या मेंदूत सतत वाजत राहणारी कविता मी थांबवू शकत नाही.

३.  मराठीची सेवा करणे, वाङमयसेवा, समाजाला दिशा देणे किंवा सामाजिक परीवर्तन घडवून आणणे, क्रांती घडवून आणणे या आणि यासारख्या इतर अनेक गोष्टींसाठी मी कविता लिहीत नाही. मी कविता लिहितो कारण मला कविता लिहायची असते.

४. कविता लिहिणे ही माझ्यासाठी एक अत्यंत खाजगी बाब आहे. कविता लिहिताना जी काही प्रक्रिया मेंदूत घडून येत असेल ती आनंद देणारी असते, या अर्थाने मी माझ्या आनंदासाठी कविता लिहितो.

मात्र कविता लिहून झाली की ती वाचकांसमोर यावी असं मला तीव्रतेने वाटते. कविता वाचून चार वाचक आपल्याला दाद देतात, बरी-वाईट प्रतिक्रिया देतात,  कवितेचा अन्वयार्थ लावतात. ही देवाण-घेवाण आनंददायी असते. 

आपण भेट दिलीत त्याबद्दल धन्यवाद!

खाली दिलेल्या जागेत आपला इमेल आयडी द्या. मी तुम्हाला नवीन कवितेविषयी नोटिफिकेशन पाठवेन.

We don’t spam! Read our [link]privacy policy[/link] for more info.